dr.satish best web design developer for mac

तेरणी ग्रामपंचायत :

महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील , गडहिंग्लज तालुक्यातील  तेरणी हे गाव कर्नाटक व महाराष्ट्र सिमेवर  वसले आहे. तेरणी गावाचे क्षेत्रफळ गावठाण क्षेत्र 13.53 हेक्टर्स, बागायत क्षेत्र 40.93 हेक्टर्स तर जिरायती कृषी क्षेत्र 837.18 हेक्टर् इतके आहे. तेरणी गावाच्या क्षेत्रामध्ये लघु पाटबंधारे तलाव असून पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी  होतो.  तेरणी गावामध्ये ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मार्फत विविध कामाची अंमलबजावणी होते.  उदा. रस्ते दुरूस्ती करणे,दिवाबत्ती सोय करणे,गटार बाधणे.  

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

तेरणी ग्रामपंचायत ही सन 05/07/1952  पासून कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस हगणदारीमुक्त  पुरस्कार सन 2010 मध्ये मिळाला आहे.

सरपंच
सौ. सुनिता रामदास सुतार


गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. महेश भाऊसो देसाई

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामविकास अधिकारी
श्री. ए.एल.शेळके

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Terani Village

ADDRESS
Terani Grampanchayat
A/p - Terani,Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416506

CONTACTS
Phone : 8806384182
Office : 8197907743